केंद्राकडे बोट दाखवणे सोडा, एखादवेळी आत्मचिंतनही करा; फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

अहमदनगर :- आपलं केलेल्या कामांचं अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय झाली आहे. आता ही सवय सोडा आणि एखादवेळी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील आघाडी सरकारला दिला. कोपरगाव येथे ४० ऑक्सिजन बेड्सच्या कोविड सेंटरचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, कुठल्या वेळी कोणते काम करायचे याचा विचार सरकारने केला पाहजे. आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचे असते. चांगलं झालं की आपली पाठ थोपटून घ्यायची. मात्र अपयश आले की लगेच केंद्राकडे बोट दाखवायचे, राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

यावेळी त्यांनी पीक विमा योजनेवरही महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकारने सुरुवातीला टेंडर काढलं नाही. उशिरा टेंडर काढलं. त्यामुळे काही जिल्ह्यांत टेंडरच झाले नाही. फळबागासंदर्भात यांनी अनेक निकष बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तिथे मदत मिळाली नाही. या संदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि टेंडरही वेळेत गेले पाहिजे, असं ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मात्र मी ते काम कधीच सुरू केलं आहे. नागपूरला थांबून जे करायचं आहे, ते आधीच पूर्ण केलं आहे. ऑक्सिजनचा साठा कमी होता, तो उपलब्ध करून दिला आहे. विविध सेवाही सुरू केल्या आहेत. आम्ही जे काही केलं, ते कदाचित आंबेडकरांपर्यंत पोहचलं नसेल. त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोहचवू, असं त्यांनी सांगितलं.

मागच्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी राज्य सरकारने घोषित केलेली रक्कम नुकसानग्रस्तांना पोहचली नाही. ही मदतही कमी होती. मागच्या वर्षी वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या होत्या. यावेळी वादळात कमी नुकसान होईल, अशी अपेक्षा करू, असंही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : सगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button