उठसूट केंद्राकडे बोट दाखवणे बंद करा : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

काेल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Center Govt) खूप काही करत आहे. याउलट राज्य सरकार मात्र उटसूट केंद्राकडे बोट दाखवत आहे. लसीकरणाबाबत केंद्राची ठोस भूमीका आहे. ठरल्याप्रमाणे लसी पाहोचतील. याजोडीला राज्य सरकारनेही जबादारी पार पाडावी, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात केंद्र शासन दुजाभाव करत आहे. महाराष्ट्राला कमी लसींचा पुरवठा केल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला होता. यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, लसी उत्पादनावर मर्यादा आहेत. केंद्र सरकार समतोल राखत लसींचे वाटप करत आहे. कोरोना काळात केंद्र सरकारनेच जनतेला दिलासा देण्याचे काम केले. याउलट राज्य सरकारने जनतेला एक रुपयांचीही मदत दिलेली नाही. केंद्राकडे बोट दाखवून रिकामे होत आहेत. केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही जबाबदारी स्विकारावी.

ही बातमी पण वाचा : आघाडीच्या नेत्यांवर आरोप होत असताना पवार आणि ठाकरे गप्प का? : किरीट सोमय्या 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER