पंढरपूरची पोटनिवडणूक थांबवा; अभिजित बिचुकलेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

Abhijeet Bhickule - Maharastra Today

मुंबई :  राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात विनंती करणार असल्याची माहिती बिचुकले यांनी दिली. अभिजित बिचुकले यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

पोटनिवडणूक न थांबवल्यास प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा बिचुकलेंनी दिला. १२ एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा पवित्रा अभिजित बिचुकले यांनी घेतला आहे. सभेसाठी येणाऱ्या  विविध भागांतील नेत्यांमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात कोरोना वाढत असल्याचा आरोप बिचुकलेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button