विनाकारण महाराष्ट्राची बदनामी करणे थांबवा : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif.jpg

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे (Mahavikas aghadi) सरकार मजबूत असून ते पाच वर्ष टिकणार असल्याने अस्वस्थ झालेले भाजप नेते कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे भाजप (BJP) राजकारण करत आहे. सुशांत बिहारचा तर कंगना हिमाचलची पण मुद्दाम महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम सुरू आहे, अशी टिका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज कोल्हापूर येथील शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईच्या बाहेर येऊन राज्याच्या हिताचा विचार करावा. त्यांनी ज्या कंगनाने मुंबईची बदनामी केली त्याला खतपाणी घालण्याचे काम भाजप करत आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना सुशांत सिंहच्या आत्महत्येवर (Sushant Singh suicide case) राजकारण सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना चालू आहेत. तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागात कोरोना आटोक्यात आला आहे. त्या भागातील डॉक्टरांना कोल्हापुरात पाचारण करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगीतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER