MPSC परीक्षेतून होणारा भाजपधार्जिणा प्रचार रोखा : यशोमती ठाकूर

Yashomati Thakur - Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत होणारा भाजपधार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन यशोमती ठाकूर यांनी  याबाबतचे   निवेदन दिले. एमपीएससी परीक्षेचे संघीकरण करण्यात येत आहे. प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपाधार्जिणा राजकीय प्रचार तसेच काँग्रेसविरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या MPSC परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत भारत सरकार किंवा केंद्र सरकारचा उल्लेख टाळला गेला. त्या ठिकाणी ‘मोदी सरकार’ असा उल्लेख करण्यात आला. तसेच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसत असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

मनुस्मृतीसंदर्भात प्रश्न

दरवर्षी लाखो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा देत असतात. गेल्या वर्षी परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न सामील करण्यात आले. जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवण्यात येत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

या राजकीयीकरणाला अभ्यासक्रमापासून दूर ठेवण्याची गरज आहे, अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button