१४ वर्षांपूर्वी चोरीस गेलेले पाकीट सापडले; आत होती ५०० ची नोट

stolen-wallet-found-14-year-later-519714

मुंबई : जेव्हा एखादी व्यक्ती आपले पाकीट, मोबाईल फोन किंवा बॅग हरवतो; विशेषतः सार्वजनिक ठिकाणी हरवल्यास, ती परत मिळेल याबाबत कुठलीही आशा नसते. मात्र रेल्वे पोलिसांनी अलीकडे एका व्यक्तीला माहिती दिली की, त्याचे १४ वर्षांपूर्वी हरवलेले पाकीट शोधले आहे.

रेल्वेने प्रवास करत असताना त्याचे पाकीट हरवले होते. हेमंत पडळकर आता ४२ वर्षांचे आहेत. २००६ मध्ये सीएसएमटी-पनवेल लोकलने जात असताना त्यांचे  पाकीट हरवले तेव्हा त्यात ५०० रुपयांच्या नोटसह ९०० रुपये होते. पडळकर यांच्या म्हणण्यानुसार, वाशीजवळ त्यांचे पाकीट हरवले होते. त्यांनी मुंबई मिररला सांगितले की, “माझे पाकीट चोरीला गेले असल्याचे समजल्यावर मी खाली उतरलो आणि वाशी जीआरपीकडे तक्रार दाखल केली.” पडळकर म्हणाले की, “सुरुवातीला नियमितपणे पोलिसांकडे पाठपुरावा केला; पण लवकरच हार मानली.

एप्रिलमध्ये जेव्हा मला वाशी जीआरपीचा फोन आला तेव्हा मला आश्चर्य वाटले. मात्र लॉकडाऊनमुळे मी जाऊ शकलो नाही.” गेल्या आठवड्यात जीआरपी कार्यालयात पोहोचले तेव्हा  ड्युटी ऑफिसरने त्यांना सांगितले की, जीआरपीने पाकीट शोधले आहे; परंतु आता कायदेशीर बाब असल्यामुळे ५०० रुपयाची नोट परत देऊ शकत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER