
मुंबई :- माहुलच्या बीपीसीएनएल कंपनीतून तेल भरून निघणाऱ्या टँकरमधील तेल चोरायचे, नंतर त्यात पाण्याची भेसळ करत तेच तेल कंपनीच्या नावाने विकत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहुल गाव परिसरात सापळा रचत ही कारवाई केली आहे. मोहम्मद आकुन मोहम्मद नसीम सिद्दीकी (२६), सैफु मोहम्मद नफीस खान (४८), राजू कैलास सरोज (३२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक आरोपी हे वडाळा येथील रहिवासी आहेत.
ही बातमी पण वाचा : बलात्काराच्या आरोपाखाली मनसे कार्यकर्त्याला अटक