शेअर बाजारात पुन्हा अस्थिरता

नफेखोरीमुळे चढ-उतार

Sensex

मुंबई : जवळपास आठ सत्रांपासून काहीसा संतुलित असलेला शेअर बाजार आता पुन्हा अस्थिर होऊ लागला आहे. बुधवारी बाजार काहीसा वधारल्यानन्तर गुरुवारी मात्र त्यात घसरण झाली. शिवाय चढ-उतारही सुरू होता.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक सकाळी दीड तास सकारात्मक होता. बाजार बुधवारपेक्षा १०० अंक वर गेला. पण त्यांनतर विक्री सुरू झाल्याने बाजारात घसरण सुरू झाली. दुपारी सव्वा दोनपर्यंत ४० ते ६० अंकांचा चढ – उतार सुरू होता. पण त्यांनतर मात्र बाजार काही मिनिटात १०० अंक घसरला. दिवसअखेर किंचित वधारून १०६ अंकांच्या घसरणीवर ३६ हजार १०६ वर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सेन्सेक्सपेक्षाही अधिक चढ-उतार होते. दिवसभर बाजार २२ वेळा २० ते ३० अंक वर-खाली राहिला. सुदैवाने तो १०,८०० दरम्यानच होता. यामुळे गुंतवनुकदारांमध्ये सकारात्मकता दिसली. दिवसअखेर निफ्टी ३३ अंकांच्या घसरणीसह १०,८२१ वर बंद झाला.