स्पुतनिक लसीचा साठा जुलै,ऑगस्टपर्यंत उपलब्ध होणार; राजेश टोपेंची माहिती

Rajesh Tope - Sputnik V

मुंबई : “राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. मात्र, लस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबवण्यात आले. आता स्पुतनिक लसीच्या (Sputnik V) वितरकांशी याबाबत चर्चा झाली आहे. येत्या जुलै, ऑगस्टपर्यंत स्पुतनिक लसींचा साठा उपलब्ध होणार आहे.” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

लसीचा साठा उपलब्ध होणार
सद्यस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र, लसींचा तुटवडा अजूनही भासत आहे. याबाबत स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चादेखील सुरू आहे. यानुसार येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे.

केंद्राने यात हस्तक्षेप करून वॅक्सीन इंपोर्टचे एक धोरण ठरवावे. लसीच्या दोन डोस झाल्यांनंतरही मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

त्याप्रमाणे, दोन्ही डोस घेतल्यावर मोठ्या प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज तयार झालेल्या व्यक्तीला कोणताही प्रॉब्लेम नसतो. लस घेतलेल्या व्यक्तींना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे अत्यंत गरजेचे आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

रशियाची स्पुतनिक लस ९९५ रुपयांना मिळणार आहे. त्यानंतर भारतात या लसीचे उत्पादन सुरू झाल्यास लसीची किंमत कमी होईल. भारतात जुलैपासून स्पुतनिकचे उत्पादन होईल, असे नीती आयोगाने सांगितले. सध्या रशियाहून १ मे रोजी भारतात दीड लाख स्पुतनिकचे डोस आलेत, अशी माहिती नीती आयोगाच्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button