शेअर बाजाराला उभारी: १२०० अंकांची झेप

मुंबई :- नव्या विषाणूमुळे एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती चीनमधून आल्याचा सकारात्मक परिणाम आशियातील शेअर बाजारावर झाला. दलाल स्ट्रीटवरही उत्साहात सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२०० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०० अंकांनी उसळला.

जगभरात कोरोनाची साथ वेगात पसरते आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे. दरम्यान, काल अमेरिकेतील शेअर बाजार तेजीत होता. अमेरिकेतील निर्देशांक ७ टक्क्यांनी वधारले होते. महावीर जयंतीनिमित्त सुट्टीमुळे भारतीय बाजार बंद होते. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनंतर आज भारतातही गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले. भारतीय भांडवली बाजारात आतापर्यंत १. ३ अब्ज डाॅलर्सची गुंतवणूक झाली आहे. शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १९६१ कोटींचे शेअर विकले.

आजच्या सत्रात इंड्सइंड बँक, गुजरात अल्कली, अॅक्सिस बँक, महिंद्रा अॅंड महिंद्रा, गोदरेज प्राॅपर्टिज, कॅडिला हेल्थकेअर, झायडस, आयपीसीए लॅब, सन फार्मा, ग्लेनमार्क फार्मा, इन्फोसिस एचयूएल, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आदी शेअर तेजीत आहेत. सध्या निफ्टी ८४४९ अंकांवर ट्रेड करत आहे तर सेन्सेक्स २८८४२ अंकांवर आहे.


Web Title : Stock market rise 1200 digit jump

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)