अल्पकालीन तेजीनंतर शेअर बाजारात घसरण

Stock market fall

मुंबई :- मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सुरुवातीला २९० अंकांची घसरण झाली. तो सध्या ४० हजार ८५० अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९२ अंकांच्या घसरणीसह १२ हजार अंकांच्या आसपास आहे.

चीनमधील ‘कोरोना व्हायरस’च्या बळींच्या वाढत्या आकड्याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी जोरदार विक्री केली. परिणामी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये २९० अंकांची घसरण झाली.

सकाळपासून आशियातील प्रमुख शेअर बाजारांवर विक्रीचा दबाव आहे. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचे आज आशियातील बाजारात पडसाद उमटले. जपानमधील शेअर निर्देशांक ०.७ टक्क्याने घसरला आहे. कोस्पीमध्ये १.४ टक्क्याची आणि ऑस्ट्रेलियातील शेअर निर्देशांकात ०.५ टक्क्याची घसरण झाली. सिंगापूर एक्सचेंजची सुरुवातही घसरणीने झाली.

बाजार उघडताच सेन्सेक्स १३० अंकांनी वाढला होता. मात्र त्यानंतर नफावसुली सुरू झाली आणि निर्देशांक कोसळले. भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, एलअँडटी, इन्फोसिस, सन फार्मा, एसबीआय, ऍक्सिस बँक, एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, आयटीसी, एचडीएफसी या शेअरमध्ये घरसण झाली. ऑटो शेअर्सला बाजारात मागणी आहे. बजाज ऑटो, हिरोमोटो कॉर्प, मारुती हे शेअर सध्या तेजीत आहेत.

रोखे बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया दर ७१.३६ होता.

‘प्रॉव्हिडंट फंड’वर कर्ज काढताय, मग हे जाणून घ्या

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये घसरण झाली होती. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६४.१८ अंकांनी घसरून ४१,१४१.८५च्या पातळीवर बंद झाला होता. त्याच वेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५१.५५ अंकांच्या घसरणीसह १२,०८६.४०च्या पातळीवर स्थिरावला होता.