शेअर बाजार तेजीत; १७९ अंकाची उसळी ३५,१०० वर सुरुवात

Stock Market

मुंबई : ‘अनलॉक २.०’ च्या घोषणेचा परिणाम शेअर बाजारावर दिसला. आठवड्याच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी बाजार सुरू होताच निर्देशाकांने उसळी घेतली. कोरोनाचे जागतिक संकट, लॉकडाऊन, आंतरराष्ट्रीय बाजार या सर्वांच्या परिणाममुळे तीन महिन्यांपासून बाजारात फारशी हालचाल दिसत नव्हती. मात्र, अनलॉक २. ० च्या घोषणेने बाजाराला गती दिली.

बाजाराची सुरुवात होताच मंगळवारी सर्वच शेअर तेजीत होते. त्यामुळे बाजाराने उसळी घेतली. सेन्सेक्सने १७९. ५७ अंकांनी वाढून ३५१४१.०९ वर सुरू झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७४. ७५ ने वादळ. १०३८७. १५ वर उघडला.

टीसीएस आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली. इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, मारुती, हिंडाल्को, ब्रिटानिया, ग्रासिम, टेक महिंद्रा, कोटक बँक, टाटा मोटर्स आणि एनटीपीसीच्या शेअरही तेजीत आहेत. आज सर्व सेक्टर हिरव्या रंगात म्हणजेच तेजीत दिसत होते.

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर देशांच्य बाजाराचा परिणामामुळे सोमवारी बाजाराची सुरुवात मंदीत झाली होती. मुंबई बाजाराचा सेन्सेक्स २६८ अंक घसरून ३४९०३. २७ अंकावर सुरू झाला होता. निफ्टीमध्ये ९१. ५० च्या घसरणीने १०२९१. ५० वर उघडला होता. सोमवारी बाजार मंदीतच बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये २०९. ७५ अंकांची घसरण होऊन ३४९६१. ५२ वर बंद झाला होता. निफ्टी ७०. ६० अंकांनी घसरून १०३१२. ४० अंकांवर बंद झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER