तरीही, राऊत यांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच आहे! – धनंजय मुंडेचे ट्वीट

शरद पवार, अजितदादा, धनंजय मुंडे पोहचले संजय राऊत यांच्या घरी ; भेटीचा व्हीडिओ

Sanjay raut-Dhananjay munde

मुंबई :  शिवसेनेचे खासदार महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेसाठी मुख्य मध्यस्थी, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी (angioplasty surgery) करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी संजय राऊत यांच्या निवास्थानी जाऊन तब्येतीची विचारपुस केली. यावेळी गायक आनंद शिंदे हे सुद्धा उपस्थितीत होते. संजय राऊत यांच्यावर 3 डिसेंबर रोजी लीलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी (angioplasty surgery) करण्यात आली होती. तब्बल सव्वा तास ही सर्जरी चालली होती. संजय राऊत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी राऊत यांना काही दिवस विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीतील दिग्गज नेते संजय राऊत यांच्या घरी पोहचल्यानंतर तेथील भेटीचा व्हिडिओ लोकमत 18 ने दिला आहे.

तर, धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांची भेट गेतल्याचे सांगत एका वर्षात दोन वेळा अँजिओप्लास्टी झाली, तरी राऊत साहेबांचे हृदय मजबूत आणि वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच आहे असे म्हटले आहे. एकंदरीत संजय राऊत यांच्या कणकर नेतृत्त्वाची स्तुती धनंजय मुंडे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER