…तरीही खडसे, जयसिंग गायकवाडांसारखी माणसे राष्ट्रवादीत आले : अजित पवार

Ajit Pawar

नांदेड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टोलेबाजी केली. कार्यकर्ते कुठे जाऊ नये म्हणून भाजप आपल्या कार्यकर्त्यांना गाजर दाखवत आहे. तरीही एकनाथ खडसे, जयसिंग गायकवाड यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते राष्ट्रवादीत आले, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी पांडुरंगाचा प्रसाद घेऊन मी संतांच्या भूमी असलेल्या मराठवाड्यात आल्याचं सांगत आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय नेतृत्वाच्या उंचीला साजेसा असा करा, असं आवाहनही केलं.

अजित पवार म्हणाले, आमच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या असूनही आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वर्षपूर्तीनिमित्ताने सरकारची वर्षभरातील कामं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यक्रम करायचे आहेत. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी मेहनतीनं काम करा. दिवस कमी राहिलेत, त्यामुळे पाचही जागी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. आपण पक्षातील कार्यकर्ते, नेते जो निर्णय घेतील त्यानुसार आपण काम करायचं आहे. कोरोनामुळे नऊ महिने फुकट वाया गेले. दुसरी कोरोनाची लाट येऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे.

नांदेडकर कोरोना विसरले की काय असं वाटण्याइतकी गर्दी दिसत आहे. परंतु  प्रत्येकाने काळजी घ्यावी. दुसऱ्याला दिलेला घास त्याच्या तोंडातून न काढता कसा मार्ग काढायचा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आम्ही सर्व समाजासाठी प्रयत्नशील आहोत. कुठलंही आरक्षण घेताना दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत तेढ निर्माण करू नका, अशी माझी हात जोडून विनंती आहे, असंही ते म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्यातील महामार्गांच्या कामावर होणाऱ्या दुर्लक्षावरही भाष्य केलं.

तसेच राज्याच्या हक्काच्या जीएसटीचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली आहेत. केंद्राकडे २८ हजार ७०० कोटी बाकी आहे. राज्याचे हे हक्काचे पैसे का दिले नाही? १२ हजार कोटी पगारांवर खर्च होत आहेत. निसर्ग चक्रीवादळात मागच्या सरकारपेक्षा जास्त मदत दिली. परतीच्या पावसात मोठे नुकसान झाले. एसटीलादेखील आम्ही पॅकेज दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER