… तरीही मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार ; संजय राऊतांचा मनसेला सणसणीत टोला

Sanjay Raut - Raj Thackeray

मुंबई : विधान परिषद निवडणुका पार पडल्यानंतर आता बृहन्मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपाकडून (BJP) मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) व भाजपा युती करणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले . तसेच त्यांनी मनसेवर टीकास्त्र सोडले .नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपाने मिशन मुंबई सुरू केलं असल्याचा आणि मनसे भाजपासोबत जाण्याचा मुद्दा यावेळी पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आला. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली .

आता हैदराबादमध्ये त्यांना ओवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते ओवेसी निर्माण करतात, ते बघावं लागेल, असे राऊत म्हणाले. मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर राऊत म्हणाले,जाऊद्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल,असा दावाही त्यांनी केला . तसेच पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच असेल, असेही ते म्हणाले .

प्रमुख महापालिकांमध्ये एकत्र निवडणुका लढल्यास चांगले निकाल लागतील. त्यासाठी आम्ही एकत्र बसू, निर्णय घेऊ. आता मुंबई महापालिकेत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. नाशिकमध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण, महाविकास आघाडीच्या अनुषंगाने विचार केल्यास तर आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. सगळ्यांचा सन्मान राखून एकत्र निवडणुका लढवाव्यात असा विचार सुरू असल्याचे राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER