ठाकरे सरकारचे स्तुत्य पाऊल ; फ्लिपकार्ट या स्वदेशी कंपनीसोबत करार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

मुंबई: ऑनलाईच्या बाजारात (online market) सामान्यांना अधिक वेगवान करत महाराष्ट्राला जगाच्या गतीने पुढे नेण्यासाठी ठाकरे सरकारने स्तुत्य पाऊल उचलले आहे. फ्लिपकार्ट (Flipkart) या स्वदेशी कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार सरकारच्या ‘व्होकल फॉर लोकल’ (Vocal for Local) या उद्घोषणेला चालना मिळणार आहे.

फ्लिपकार्टने महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्याबरोबर सामंजस्य करार केला असून त्या मार्फत छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कोरोनाच्या संकटातून हस्तकला आणि हातमाग उद्योगाला उभारी देण्यासाठी आम्ही हे क्रांतिकारी पाऊल उचलं अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

या फ्लिपकार्ट समर्थ उपक्रमाच्या करारावर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सही केली.

यावेळी बोलताना, आदिती तटकरे यांनी या करारामुळे ग्रामोद्योग, हस्तकला, हातमाग उद्योग क्षेत्राला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, फ्लिपकार्टचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजनीश कुमार यांनीही फ्लिपकार्ट समर्थ हा एक महत्त्वाचा उपक्रम असून त्यामार्फत आम्ही देशभरातील अधिकाधिक छोट्या व्यावसायिकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहोेत आणि महाराष्ट्रात ही संधी मिळाल्यामुळे आम्ही जोमाने काम करण्यास इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं आहे.

दरम्यान, फ्लिपकार्ट समर्थ हा राष्ट्रीय पातळीवर असलेला उपक्रम असून त्याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. त्या मार्फत स्वदेशी खादी कपडे, हस्तकलेच्या वस्तू, कागदी पर्स, कागदी वस्तू, दागिने, लाकडी खेळणी, पैठणी साड्या तसेच इतर बऱ्याच वस्तू देशातील करोडो लोकांसमोर मांडता येतील आणि देशातील वेगवेगळ्या भागातील ग्राहकांना आकर्षित करून आपल्या वस्तूंची विक्री करता येईल, हा त्यामागचा मुळ उद्देश आहे. जवळपास देशातील 7,50,000 हून अधिक व्यावसायिक या उपक्रमात जोडले गेले आहेत आणि त्याद्वारे रोजगार मिळवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER