साडी नेसून चोरी करायचा चोऱ्या !

Thief

शिर्डी : गेल्या सहा महिन्यांपासून शिर्डी जवळच्या कोपरगाव परिसरात चोऱ्या एक चोर बिनधास्त चोऱ्या करायचा पण पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. चोर कधी कुणाला दिसत नव्हता; चोरी होण्याच्या ठिकाणी कुणी संशयास्पद माणूस आढळत नव्हता. कारण तो चोर साडी नेसून चोऱ्या करायचा! आणि पोलीस चोर (माणूस) शोधण्यात गुंतले असायचे.

बऱ्याच तपासानंतर सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांच्या लक्षात आले की, बऱ्याच चोऱ्या कुणीतरी महिला करते आहे. पण, ती चेहरा दिसू न देण्याची खबरदारी करत असल्याने ओळख पटणे कठीण होते. मग पोलिसांनी त्या महिलेच्या शरीरयष्टी आणि त्याच्या हालचालीच्या लकबींचा अभ्यास करून संजय पाटील या संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे बिंग फुटले; त्याला बेड्या ठोकल्या. संजय पाटील जळगाव जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील रहिवासी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER