कॅफे कॉफी डेमध्ये चोरी

Stealing at Café Coffee Day

मुंबई :- कांदीवलीतील कॅफे कॉफी डे मध्ये घुसलेल्या लुटारुने कॅश काऊंटरमधील रकमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करुन समतानगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

कांदीवली पुर्वेकडील एका मॉलमध्ये असलेल्या कॅफे कॉफी डे मध्ये 4 ऑगस्टच्या रात्री पावणे दोनच्या सुमारास घुसलेल्या लुटारुने कॅश काऊंटरमधील 23 हजार 748 रुपयांवर डल्ला मारला. चोरीचा हा धक्कादायक प्रकार समोर येताच एका कर्मचारी महिलेने ही माहिती एरीया मॅनेजर यांना कळविली. त्यांनी कॅफे कॉफी डे मध्ये धाव घेत येथील सीसीटिव्ही फुटेज बघितले असता लुटारुचा हा प्रताप सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता. अखेर त्यांनी समतानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.