ज्या राज्यावर विश्वास आहे तिथं राहा; अनिल परब यांनीही कंगनाला खडसावले

Anil Parab & Kangana ranaut

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबई पोलीस व मुंबईला बरे-वाईट म्हणणे तिला चांगलेच महागात पडत आहेत. ज्या मुंबईने  तिला ओळख दिली त्याच शहरावर टीका केल्याने बॉलिवूड ते राजकीय नेत्यांनी कंगनाला चांगलेच खडसावले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता शिवसेनेचे (Shivsena) नेते परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनीही कंगनावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. मुंबईने अनेक कलावंत घडवले, त्यांना ओळख दिली. यासाठी सर्वच कलाकारांनी मुंबईचे आभार मानले; मात्र, कंगना रणौत जिला मुंबईने घडवले तिने मुंबईवर टीका केली. सिनेमात भूमिका केली म्हणजे कुणी झाशीची राणी होत नाही- अशा शब्दांत अनिल परब यांनी कंगनाचा समाचार घेतला आहे.

तसेच, कंगनाच्या या भूमिकेमागे कोणाचा चेहरा लपला आहे? मुंबईचं बॉलिवूड शिफ्ट करण्याचा डाव आहे का, असा प्रश्नही अनिल परब यांनी केला. एवढेच नाही तर, ज्या राज्यावर विश्वास आहे तिथे राहा, असेही परब म्हणाले. सुशांत सिंह आत्महत्या चौकशी प्रकरणात ज्या प्रकारे कंगना हस्तक्षेप करत आहे, मात्र आतापर्यंत तिने सीबीआयला कुठलीही माहिती दिलेली नाही.

कंगनाकडून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपदेखील परब यांनी केला. तसेच, संजय राऊत यांनी कंगनाला दिलेलं उत्तर योग्य आहे, असेही परब म्हणाले. तर, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर  म्हणणारी कंगना कधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली आहे का, असा खोचक प्रश्नही अनिल परब यांनी केला. ते न्यूज-१८ लोकमतसोबत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER