‘अशा गोष्टींपासून दूर राहा !’ शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा खडसे, महाजनांना मोलाचा सल्ला

Eknath Khadse - Girish Mahajan - Gulabrao Patil - Maharashtra Today
Eknath Khadse - Girish Mahajan - Gulabrao Patil - Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. भाजपचे (BJP) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबद्दल खडसे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दोन्ही नेत्यांना अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यातील कोरोनास्थिती (Corona) आणि लसीकरणावर (Vaccination) चर्चा करण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राज्यात राबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. गुलाबराव पाटील याच लसीकरणाची माहिती देत होते. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबद्दल विचारण्यात आले. यावर भाष्य करताना एकनाथ खडसे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती मला आताच मिळाली. या दोघांचा नेहमीच वाद सुरू असतो. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचं संकट आहे. तसेच आपल्या जळगाव जिल्ह्याला कोरोनापासून दूर कसं ठेवता येईल, हे पाहिलं पाहिजे. त्यामुळे सध्या तरी अशा गोष्टींपासून दूर राहायलं हवं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button