वैधानिक विकास महामंडळ : अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा ‘हक्कभंग प्रस्ताव’

Sudhir Mungantiwar and Ajit Pawar

मुंबई : वैधानिक विकास महामंडळाची (Statutory Development Corporation) पुनर्स्थापना करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याच्या आरोपात भाजपाचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Proposal of infringement) सादर केला. प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रस्ताव हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे निर्देश दिलेत.

वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी दिले होते. सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे, असा आक्षेप घेत सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंग प्रस्ताव दिला आहे.

मुनगंटीवारांच्या आग्रही मागणीवर अजित पवारांनी उत्तर दिले होते – विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावे जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळे घोषित करू.

अजित पवार यांच्या या उत्तरावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १२ आमदारांसाठी विदर्भ-मराठवाड्याच्या जनतेला ओलीस धरता आहात का, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER