‘स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे’, OLXवर जाहीरात, FIR दाखल

Statue of Unity is for sale-advertised on OLX, FIR filed

अहमदाबादः जगातील सर्वांत उंच प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे. अशी जाहीरात OLX वर देणे एका भामट्याला चांगलेच महागात पडले आहे. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये असलेली ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्याची जाहिरात थेट OLX वर दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक आहे. तिथे त्यांचा १८२ मीटर उंच पुतळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८मध्ये या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं.

कोरोना विषाणुमुळे सध्या भारत बंद करण्यात आल्याने देशावर आर्थिक संकट असल्याचे सांगत कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय सेवा आणि सरकारी हॉस्पिटल्सवरील खर्च भरून काढण्यासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ३० हजार कोटी रुपयांत विकणे आहे, अशी जाहिरात OLX वर देण्यात आली होती.

३०, ००० कोटींत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीला

एका अज्ञात गृहस्थाने हॉस्पिटल्ससाठी आवश्यक असलेली उपकरणं खरेदी करण्यासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ३० हजार कोटींमध्ये विकायची आहे, असं म्हटलं होतं, अशी माहिती केवडिया पोलिसांनी दिली.