थकीत पगारासाठी एस.टी कामगारांची राज्यभर निदर्शने

S.T Logo

पुणे : मागील तीन महिन्याचे थकीत वेतन एकरकमी ताबडतोब मिळावे यासाठी शुक्रवारी राज्यभरातील एस.टी कामगारांनी आत्मक्लेष आंदोलन केले. राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासह सर्व आगारासमोर निदर्शने करुन आगारप्रमुख निवेदन देण्यात आली. उपोषण करुन आत्मक्लेष करण्याचे ठरले होते, अनेक ठिकाणी पोलीसांनी मज्जाव केल्याने परिवहन मंत्री, महामंडळ अध्यक्षांच्या नावे विभागनियंत्रकांकडे पत्र देऊन मागण्यांकडे गांभिर्याने पाहण्याची विनंती केली.

तीन महिन्यापासून पगार नसल्याने एस.टी कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बुधवारपर्यंत वेतन द्यावे अन्यथा उपोषण सुरु केले जाईल असा इशारा दिला होता, तरीदेखील प्रशासनाने लक्ष दिले नाही. म्हणून शुक्रवारी राज्य वाहतूक एस.टी कामगार संघटने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. उपोषणास बसण्यास पोलीसांनी मज्जाव केल्याने संघटनेने तेथेच जोरदार निदर्शने करुन विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले. विभागीय कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व आगारासमोर सकाळी एकाच वेळी कामगारांनी निदर्शने करत आत्मक्लेष आंदोलन केले. यात एसटीचे चालक, वाहकासह सर्व कर्मचारी सहभागी झाले.

आता एस.टी ची सेवा सुरु झाली आहे. कोरोना काळात पगार मिळत नसतानाही ते जीव धोक्यात घालून काम करत आहेत. जूनपर्यंतचे निम्मे वेतन मिळाले आहे. जुलै ते सप्टेबर या कालावधीतील पगार मिळालेला नाही. हातात पैसाच नसल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामंडळाने याकडे गाभिर्याने पाहण्याची मागणी कामगारांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER