महागाई विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन ; पुण्यात थेट पेट्रोल पंपावर नेली घोडागाडी

Statewide agitation of Congress

पुणे : देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनाची अवाजवी दरवाढ सुरु आहे . या पार्श्वभूमीवर महागाई विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन (Statewide agitation) केले आहे . पुण्यात काँग्रेसच्या (Congress) वतीने शहरातील ३५ पेट्रोल पंपांवर एकाच वेळी आंदोलन करण्यात आले. राज्यात १ हजार ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या (Modi Govt) निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनासाठी घोड्याची बग्गी आणली होती. त्यात बसून जोशी व पदाधिकार्यांनी मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्यावी, देशाला विश्वासात घेऊन मोदी यांनी इंधन दरवाढीतून मिळालेल्या पैशांचे काय केले त्याचा खुलासा करावा अशी काँग्रेसची देशपातळीवर मागणी असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

कुलकर्णी पेट्रोल पंपाजवळ जोशी यांच्यासहीत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब अमराळे व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जोशी म्हणाले, मोदींच्या कारकिर्दीत पेट्रोलची ३५० टक्के तर डिझेलची ९०० टक्के वाढ झाली. यातून मिळालेले ८० हजार कोटी रूपये कुठे गेले याचा पत्ता नाही. मोदी सरकार देशाची लूट करत आहे हाच याचा पुरावा आहे, असेही जोशी म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button