संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचे वक्तव्य

maharastra police - Sanjay Rathod

पुणे : गेल्या १२ दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव पुढे आले आहे. सोशल मीडिया माध्यमांवर काही ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनीही संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. अशातच पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात आवश्यकता असल्यास वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात राठोडांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या आत्महत्याप्रकरणातील अरुण राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर ज्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत, त्यामध्ये अरुण राठोड याने  मंत्र्यांशी संवाद साधल्याचे सांगितले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात संजय राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी संजय राठोड यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER