ऊसतोडणी कामगारांचे ५ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन : आ. सुरेश धस

Suresh Dhas

कोल्हापूर : राज्यात ऊस तोडणी कामगार, वाहतुकदार, मुकादम आदी कामगारांच्या दरवाढ मागणीसाठी संप सुरु आहे. हा संप यशस्वी होण्यासाठी तसेच मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या ५ ऑक्टोंबरला राज्यव्यापी आंदोलन पुकारण्याचा इशारा माजी मंत्री आमदार सुरेश आण्णा धस यांनी बुधवारी कोल्हापुरात (Kolhapur) दिला.

आमदार सुरेश आण्णा धस (Suresh Dhas) हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर जिल्हा वाहतुक चालक मालक संघटना यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये आमदार धस बोलत होते. ते पुढे म्हणाले, कारखानदारांनी चालवलेल्या लुटीमुळे ऊसतोडणी कामगार बेघर झाला आहे. त्यांच्यावर आत्महत्येसारखी वेळ आली आहे. ऊस कारखानदार कर्जबाजारी झाला असता तर त्यांनी जमिनी विकून आत्महत्येसारखा प्रयत्न केला असता. ऊसतोड मजूर हा बीड भागातील असला पाहिजे. ऊसतोड मशीनरी आल्याने अनेक ऊसतोड मजूर बेरोजगार झाला आहे. एका कोयत्यामागे एका जोडप्याला आपण ५० हजार ते दीड लाख रुपयांची उचल देत होतो. पण मशिनरी आल्यामुळे हे सगळ थांबल आहे. मजूरांचा विमा कारखान्यातर्फे उरविला जातो. परंतु काही अपघात झाल्यास जखमी मजूराची नुकसानभरपाई कारखानदार मुकादम तसेच वाहतूक दारांकडून वसुल करतात. कारखानदारांनी मुकादम आणि वाहतुकदारांची चालवलेली ही एक लुटच आहे असा आरोपही आमदार धस यांनी यावेळी केला.

शासनाने अनेक कामगारांच्या बाबतीत कायदे केले. पण ऊसतोड कामगारांच्या बाबतीत कायदे केलेले नाहीत. आपल्यासाठी असा एक हक्काचा कायदा असण गरजेच आहे. त्यासाठी आपली एक मजबुत संघटना स्थापन करण्याची हिच वेळ आहे. त्यानुसार गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसा तोडणी मजूर मुकादम व वाहतुकदार संघटनेचे कार्य राज्यभर विस्तारत आहे. ही संघटना वाढीस लावा, जेणेकरुन आपल्या मागण्या शासनदारबारी या संघटनेच्या माध्यमातून ठेवल्या जातील. येत्या पाच आॅक्टोंबरला ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या दरवाढीसंदर्भात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

या चर्चासत्रास वाहतुकदार संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील,श्रीकांत गावडे, बाबा देसाई, बाबासाहेब पाटील, भगवान काटे,गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार व वाहतुकदार संघटनेचे तात्यासाहेब हुले बापू,श्रमिक संघटनेचे दत्तोबा भांगे,पाटोदा नगराध्यक्ष बळीराम पोटे,जिल्हा प.सदस्य. हरिबाप्पा घुमरे बीड,सभापती बालाजी जाधव, नगरसेवक अमोल दीक्षित ऊसतोड कामगार पुत्र दत्ता हुले ,विष्णू भाकरे,यांच्यासह प्रमुख ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहतुकदार उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER