राज्यानेही मराठा समाजाला ३००० कोटींचे पॅकेज द्यावे : चंद्रकांत पाटील

CM Thackeray-Chandrakant Patil

मुंबई :- सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाला (Maratha Community) दिलेलं आरक्षण रद्द केल्यानंतर संपूर्ण राज्यातील मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र सरकारने यानंतर लगेचच १०२ व्या घटनादुरुस्तीवर फेरविचार याचिका दाखल करायला हवी होती. पण राज्यानं ती केली नाही. त्यामुळं केंद्र सरकारने तातडीने गुरुवारी ही याचिका दाखल केली. त्यासाठी केंद्राचे आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार गंभीर असून पूर्ण ताकदीने यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारलाही मराठा समाजासाठी काही तरी करण्याचं आवाहन केलं. केंद्रानं याचिका दाखल केली आहे; पण राज्य सरकारनंही मराठा समाजासाठी ३००० कोटींचं पॅकेज जाहीर करावं, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. यामध्ये मेडिकल आणि इंजिनीअरिंगच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या अ‌ॅडमिशनचे शुल्क द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसंच मराठा बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सहकार्य व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाला १००० कोटी देण्याची मागणीही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने ज्या योजना जाहीर केल्या होत्या त्या योजना सुरू करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्यात मराठा समाज ३२ टक्के आहे. त्यांच्यासाठी ३००० कोटी ही रक्कम किरकोळ आहे, ती सरकारनं द्यायला हरकत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच अजितदादा पवार डायनॅमिक मंत्री आहेत. त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी सुचवले आहे.

ही बातमी पण वाचा : केंद्राची याचिका : मराठा आरक्षणाला मोठी मदत मिळेल – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button