राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा वाद : थोरात आणि पाटील गटात चुरस

माजी आमदार शिवाजीराव पाटील - संभाजीराव थोरात

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक कोणाचा, यावरून संभाजीराव थोरात (Sambhajirao Thorat) व माजी आ. शिवाजीराव पाटील (Shivajirao Patil) यांच्या गटाकडून पत्रकाबाजी सुरू झाली आहे. दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. दोन्ही गट प्राथमिक शिक्षक संघ आमचाच असल्याचे सांगत असल्याने प्राथमिक शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

धर्मादाय आयुक्तांनी २०१६ ला शासनाचा प्रतिनिधी घेऊन शिक्षक संघाच्या सभासदांमधून निवडणूक घेऊन राज्य कार्यकारिणी निवडण्यात यावी, असा निकाल दिला. हा निकाल माजी आ. पाटील गटाने मान्य केला. विरोधकांना लोकशाही पद्धतीने कार्यकारिणी मान्य नसल्याने त्यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले. त्यांनी कार्यकारिणी निवडून द्यायच्या पद्धतीला विरोध केला. पुणे न्यायालयात वाद प्रलंबित असल्याचे वरुटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

ग्रामविकास विभागाने ऑक्टोबर २०१८ च्या पत्रान्वये राज्यातील जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४कर्मचारी संघटनेचे श्रमिक संघ अधिनियम १९२६ अंतर्गत उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष तांबारे यांनी, तर दुसऱ्या गटाकडून राज्य प्राथमिक शिक्षक संघ या एकाच नावाने उपनिबंधक श्रमिक संघ पुणे कार्यालयात नोंदणीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. उपनिबंधक श्रमिक संघ पुणे यांनी प्रदेशाध्यक्ष तांबारे यांनी दाखल केलेला प्रस्ताव मान्य करून त्यांना नोंदणीबाबत ५ नोव्हेंबर रोजी प्रमाणपत्र दिले. दुसऱ्या गटाने दाखल केलेला प्रस्ताव अमान्य केला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या नावाऐवजी दुसऱ्या नावाने प्रस्ताव दाखल करण्याबाबत कळविले आहे, असे प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER