मुंबईतील प्रसिध्द स्थळांसाठी ३२० कोटी देणार, अंदाजपत्रकपूर्व तरतूद

India Gate

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध स्थळांची देखभाल आणि नूतनीकरण करण्यासाठी ३२० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पर्यटक आकर्षित व्हावे म्हणून काही स्थळांचा चेहरामोहराही बदलण्यात येणार आहे. यासाठी अंदाजपत्रकपूर्व तरतूद करण्यात आली आहे.

पर्यटकांच्या संख्येत घट वाढ करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

गेट वे ऑफ इंडिया, बॅलॉर्ड इस्टेट कोर्ट, मणिभवन संग्रहालय, आझाद मैदान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कान्हेरी लेणी आदी स्थळांचा यामध्ये समावेश आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे धरणे आंदोलन

याबाबतचा निर्णय वित्त विभागाने या आठवडय़ाच्या प्रारंभी घेतला. आर्थिक वर्ष २०२१ – २०२२साठी महाविकास आघाडी सरकारतर्फे ६ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे.

पर्यटन मंत्रालयानुसार, २०१८मध्ये १६.३६ लाख विदेशी पर्यटकांनी मुंबईला भेट दिली होती. विदेशी पर्यटकांबाबत याच कालावधीत दिल्लीत हेच प्रमाण ३०.४३ लाख होते. मुंबईत दरवर्षी भारतातून सुमारे २५ ते ३० लाख पर्यटक येतात, तर दिल्लीत सुमारे एक कोटी पर्यटक भारतातून येतात. मुंबईत एलिफंटा, कान्हेरी लेणी आणि गेट वे ऑफ इंडियाला भेट देणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे, हे येथे उल्लेखनीय.