राज्यातील टाळेबंदी २८ फेब्रुवारी पर्यंत वाढवली ; राज्य सरकारने घेतला निर्णय

Maharashtra Lockdown

मुंबई : राज्यातील लॉकडाऊनची (Lockdown) मुदत शासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. मात्र काही अटी आणि शर्ती कायम ठेवल्या आहेत.

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव  नियंत्रणात आला आहे. मात्र  ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने राज्य सरकार (State Government) खबरदारी घेत येत आहे. म्हणून कोरोनाचा धोका नको म्हणून टाळेबंदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय  शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. टाळेबंदीची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत असेल.

राज्यातील टाळेबंदी मुदत ३१ जानेवारी २०२१ रोजी संपत होती. ती वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Government) आज घेतला. टाळेबंदी काळात मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील.  तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित निश्चित कार्यपद्धती प्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील प्रतिबंधित क्षेत्रात  टाळेबंदी कायम असणार आहे.

राज्यातील लॉजेस, हॉटेल्स तसेच खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने चालू करण्यास संमती नाही. खाजगी  कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू आहेत. सिनेमागृहे आणि जलतरण तलाव यावरील निर्बंध केंद्राने हटवले असले तरी राज्याने अजून त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. तसेच मुंबई लोकल सर्वाना १ फेब्रुवारीपासून खुली होणार आहे. मात्र त्यात वेळेच्या अटी आहेत. महाविद्यालये अजून बंदच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER