राज्यातील प्रश्नांवर चर्चा होणं गरजेचं, दोन दिवसाचं अधिवेशन मान्य नाही – प्रवीण दरेकर

Pravin_Darekar

कोरोना (Corona) महामारीमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हे अधिवेशन दोन दिवसांचं होणार असून ते 14 आणि 15 डिसेंबरला होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यावर भाजप (BJP) नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांचे अधिवेशन आम्हाला मान्य नसल्याचे विधानपरिषदेचे विरोधपक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे. राज्यातील प्रश्नांवर चर्चा होणे गरजेचं असल्याचेे प्रतिपादन दरेकर यांनी केले.

दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या दोन दिवसीय अधिवेशनाला विरोध दर्शवला आहे. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभं राहिलं आहे. अतिवृष्टीमुळं पिकांचं आणि शेतजमिनीचं आतोनात नुकसान झालं आहे. सध्या कापूस आणि तुरीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मिळालेली चपराक, अशा सर्व विषयांवर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी किमान दोन आठवड्याचं अधिवेशन घ्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. पण सरकारकडून ती मान्य करण्यात आली नाही”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी प्रकट केल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. 2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे राज्यासमोर असलेल्या जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER