राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर, राजीनामा द्या – अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar - Anil Deshmukh

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनीच प्रयत्न केला होता; पण तो वेळीच हाणून पाडला, असा धक्कादायक गौप्यस्फोट खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. त्यावर टीका करताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली की, राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत व मागणी केली की, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

तपासात एक इंचही पुढे न सरकणाऱ्या अधिकाऱ्यात हे बळ आले कुठून ?

अतुल भातखळकर यांनी प्रश्न केला की, अनिल देशमुख यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई केली? याची माहिती जनतेपासून का लपवून ठेवली? या गृहमंत्र्यांच्या ज्या आयपीएस अधिकाऱ्यांना दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी दोन महिन्यांत एक इंचही पुढे सरकता आले नाही, त्यांना राज्य सरकार पाडण्याचे बळ कुठून आले?

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अनिल देशमुख म्हणाले – काही अधिकारी चांगले काम करत आहेत; पण पोलीस खात्यात काही अधिकारी असेही आहेत जे राजकीय नेत्यांशी जवळीक साधून आहेत. त्यांची नावं  घेता येणार नाही.

चार ते पाच वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश आहे!

आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने त्यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि हे प्रकरण मार्गी लावले.

एवढंच नाही तर, शरद पवारांनी (Sharad Pawar) एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेतले. त्यानंतर त्यांना तातडीने पदावरून बाजूला करण्यात आले. चार अधिकाऱ्यांची नावंही सांगितली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने पावले उचलत काही अधिकाऱ्यांना बाजूला सारले. काही अधिकारी अजूनही पदावर कायम आहेत. अशा अधिकाऱ्यांना तातडीने बाजूला हटवायला पाहिजे होते, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने केली होती, असेही देशमुख म्हणालेत.

दरम्यान, मार्च महिन्यात लॉकडाऊन (Lockdown) लागू झाला. त्यानंतर अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाऱ्याने ‘येस बँक’ घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान याच्यासह २२ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी पत्र दिले होते. या पत्रामुळे भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले होते. नुकतीच अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची बदली करण्यात आली असून त्यांना पुण्याचे आयुक्त नियुक्त केले आहे.

अमिताभ गुप्ता यांच्याकडून मोठी चूक झाली होती. त्यांनी खुद्द चौकशी समितीकडे याची कबुली दिली. पण त्यांची कारकीर्द चांगली असल्यामुळे त्यांना पुण्याचा पदभार दिला, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER