मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची रणनीती चुकली- फडणवीस

Devendra Fadnavis - Supreme Court - Maratha Reservation

मुंबई : फडणवीस सरकारने लागू केलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) टिकू न शकल्याने मराठा बांधवांची निराशा झाली आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते हे आरक्षण लागू करण्यासाठी, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ, असे आश्वासन देत आहेत. माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी आरक्षण कोर्टात टिकवण्याठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडल्याचे म्हटले आहे. तसेच, हे आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ सरन्यायाधीशांकडे जावं असा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आरक्षण हा राज्याचा कायदा आहे. यात केंद्र सरकारचा संबंध नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, या आरक्षणावर स्थगिती आणली आहे. हे प्रकरण घटनापीठाकडे गेले आहे.

अजूनही आपण आरक्षणासाठी प्रयत्न करू शकतो. घटनापीठ स्थगिती काढत नाही तोपर्यंत स्थगिती कायम राहते. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण लागू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले पाहिजे. तसेच, मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर बाजू मांडण्यात आपण कमी पडलो का, याचाही विचार राज्य सरकारने करायला हवा, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राज्यात जे कंगनाच्या  मुद्द्यावरून राजकारण चालले आहे, त्यात भाजपचा (BJP) संबंध नाही. कंगनाचा मुद्दा भाजपनं उचलला नाही हेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER