पत्रकारांवरील कोरोना उपचाराचा खर्च राज्य सरकार देणार; मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती

भोपाळ :- देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना (Corona) रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशा वेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी पत्रकारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चौहान यांनी राज्यातील पत्रकारांना मोठा दिलासा आहे. पत्रकार आणि त्याच्या कुटुंबातील कोरोनाबाधित रुग्णांवर होणारा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे चौहान यांनी सांगितले आहे.

चौहान ट्विटमध्ये म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या तीव्र संकटामध्ये आमचे मीडिया मित्र अहोरात्र निष्ठेने कर्तव्य बजावत आहेत. आम्ही पाहिले आहे की, अनेक पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले. आम्ही त्यांच्या कर्तव्यावर भारावून गेलो आहोत, असेही ते म्हणाले. आमच्या राज्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोना आजाराने ग्रस्त असल्यास त्यांच्यावरील उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे चौहान म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button