परमबीर सिंग यांना दिलासा, १५ जूनपर्यंत अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

Parambir Singh - Maharastra Today

मुंबई : ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना उच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीवेळी अंतरिम दिलासा दिला होता. ९ जूनपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) १५ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही किंवा कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर यांची ठाणे पोलीस करत असलेला गुन्हा रद्दबातल करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी सोमवारी घेण्यात येईल.

याआधी झालेल्या सुनावणीत सिंग यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचविण्यास परमबीर सिंग यांनी भिमराव घाडगे यांना सांगितले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नाही, असे सांगत घाडगे यांनी परमबीर सिंग यांना नकार दिला होता. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांना निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button