भीमा कोरेगाव प्रकरणातील राज्य सरकारने नेमके कोणते गुन्हे मागे घेतले याचे स्पष्टीकरण द्यावे – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Bhima Koregaon

मुंबई : दोन वर्षांपुर्वी भीमा कोरेगावला जी दंगल उसळली होती त्याची शहानिशा करण्यात अद्यापही राज्य सरकारला फारसे यश आलेले नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील राज्य सरकारने नेमके कोणते गुन्हे मागे घेतले, असा प्रश्न सरकारला केला आहे.

भीमा कोरेगाव, मराठा आणि शेतकरी आंदोलनादरम्यानचे तरुणांवरील गुन्हे मागे : गृहमंत्री

प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी राज्य सरकारने नेमके कोणते गुन्हे मागे घेतले याचे स्पष्टीकरण द्यावे असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाच्या काही गुन्हे मागे घेतल्याची घोषणा केली. याप्रकरणात दोन प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. १ जानेवारीला ज्या अलुतेदार-बलुतेदार, बौद्ध समूहांवर हल्ला करण्यात आला त्या संदर्भात वेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर या हल्ल्याच्या निषेधार्थ २ आणि ३ जानेवारीला जो निषेध करण्यात आला त्यासंदर्भातही काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नेमके कोणते गुन्हे मागे घेतलेत याचे स्पष्टीकरण द्या अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.