राज्य सरकारने १५ लाख लसींचा हिशोब द्यावा; केशव उपाध्ये यांची मागणी

पंढरपूर : नियम डावलून किती लाडक्यांचे लसीकरण केले, असा सवाल केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला सुरवातीच्या काळात कोरोना वरील प्रतिबंधात्मक लसींचा पुरेशा पुरवठा केला होता. राज्य सरकारने नियमानुसार लसीकरण न करता खास लोकांनाच लस दिली आहे. त्यातच ३ लाख लसी राखीव ठेवल्या आहेत. सरकारने १५ लाख लसींचा हिशोब द्यावा आणि आतापर्यंतच्या पुरवठा केलेल्या लसींची चौकशी करावी, अशी मागणी ही भाजपचे प्रदेश प्रवक्ते केवश उपाध्याय यांनी केली आहे.

“महाराष्ट्रातील लसीचा तुटवडा, लसी कमी असल्याचे संकट हे महाविकास आघाडी सरकार निर्मित संकट आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून नेमक्या लसी कोणाला दिल्या? नियम, अटीत बसणाऱ्यांनाच दिल्या का? याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारने दिला पाहिजे.” अशी मागणी उपाध्याय यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

सुरुवातीला फ्रंट लाईनवरच्या लोकांचे लसीकरण करणे आवश्यक होते. परंतु सरकारने नियम बाह्यपणे खास लोकांचे लसीकरण केले आहे, असा गंभीर आरोप उपाध्याय यांनी केला आहे. शिवाय ३ लाख लसी राखीव ठेवल्याने सध्या राज्यात कृत्रिम लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसींचा तुटवडा जाणवू लागताच महाविकास आघाडी सरकारने केंद्रावर निशाणा साधला आहे. सरकार अपयश लपवण्यासाठी केंद्रावर आरोप करत आहे. या निमित्ताने ठाकरे सरकारचा ढोंगीपणा समोर असल्याचेही केवश उपाध्याय यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button