राज्य सरकारचे कोरोनाकाळात दुर्लक्ष, महापालिकेला ५०० कोटी द्या : गिरीश बापट

Girish Bapat

पुणे : राज्य सरकारने कोरोना रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून काही केलेले नाही. कोरोना संकटात महाविकास आघाडी सरकारने पुण्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप भाजपने केला आहे. तसेेेच, मदत करण्याऐवजी सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, आमचा पूर्ण विरोध आहे. साथीचे रोग ही सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे सरकारने पुणे महापालिकेला ५०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणीही यावेेळी भाजपने केेली आहे.

भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या पत्रकार परिषदेत सरकारवर टीकेची झोड उठवली.

गिरीश बापट म्हणाले की, “आताच्या घडीला लॉकडाऊन कोणालाही परवडणार नाही. रडतखडत का होईना, काही करता येत आहे. पण लॉकडाउन जाहीर झाला, तर सगळ्यांनाच फटका बसणार आहे. केंद्राने मदत केली आहे, आता राज्यानेही करावी. कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.”

आज एक रुग्णवाहिका दिली आहे. मात्र ,११ रुग्णवाहिकांची दिलेली ऑर्डर अद्याप मिळालेल्या नाहीत. आम्ही राजकारण करत नाहीत. मदतीचा हात पुढे घेवुन आलो आहोत. तर पुण्यावरचे संकट परतवुन लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि राहणार.” असेही बापट यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button