राज्य सरकार, महापालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar

मुंबई :- कोरोनाच्या (Corona Virus) या महामारीमुळे राज्यात सर्वत्र ठिकाणी लसीचा तुटवडा भासत आहे. यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आले आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. दुसरीकडे, ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यातही अडथळा जाणवत आहे. तर खासगी क्षेत्रात लसीकरण विनाअडथळा सुरू आहे.

या मुद्द्यावर खासगी रुग्णालयांच्या लस पुरवठ्यावर महापौर पेडणेकर यांनी बोट ठेवले आहे. केंद्र खासगी क्षेत्राला पैसे घेऊन लस पुरवठा करत आहे. याचप्रमाणे राज्य आणि महापालिकेला लस पुरवठा करावा. आम्हीही पैसे देतो. एवढेच नाही तर लोकांनाही लस मोफत देतोय, असे पेडणेकर म्हणाल्या. पेडणेकर म्हणाल्या की, “खासगी रुग्णालये केंद्राकडून लस विकत घेऊन लसीकरण करत आहेत. लस घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतात.

पण पालिका लोकांना मोफत देते. केंद्र महापालिकेला न देता खासगी क्षेत्राला लस देत आहे. यामुळे कोणी एक हजार रुपयांना तर कोणी १ हजार ८०० रुपयांना लस विकत आहेत. आम्ही केंद्राला लसींसाठी पैसे द्यायला तयार आहोत; पण तो पुरवठा पालिकेला मिळत नाही. राज्य सरकार, महापालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार आहे.”

ही बातमी पण वाचा : चीनच्या Sinovac लसीला आपत्कालीन वापरासाठी डब्लूएचओकडून मान्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button