सध्या राज्यात ई-पास बंधनकारक राहणार; विजय वडेट्टीवार यांचे संकेत

vijay-waddetiwar-E pass

मुंबई : केंद्र सरकारने अनलॉक -४ ची (Unlock-4) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. येत्या १ सप्टेंबरपासून (1 Sept) लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वात नमूद आहे. त्यामुळे राज्यात प्रवास करताना ई-पासची अट रद्द होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. मात्र राज्यात ई-पास (E-Pass) बंधनकारक राहणार असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

सध्या राज्यात ई-पास बंद करण्याला राज्य सरकार अनुकूल नाही. ज्यांना गरज आहे अशांनाच ई-पास दिला जातो. केंद्र सरकारने टाळेबंदीबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात ई-पास निर्बंध उठवावे अशा सूचना केल्या आहेत. मात्र, यासाठी राज्य सरकार अनुकूल नसल्याचे विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी म्हटलं आहे.

खरं पाहता, लोकांमध्ये ई-पासवरून नाराजी आहे. त्यामुळे केंद्राच्या नियमानंतर राज्य सराकर याबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे. राज्य सरकारची उद्यापर्यंत नवीन नियमावली येईल असे सांगितले जाते. केंद्र सरकारने ६ ते १२ इयत्ता वर्ग सुरू कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्यावतीने जिम सुरू करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे. ई-पासवरून लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ई-पास रद्द करावा अशी जोरदार मागणी आहे. पण ग्रामीण भागांमध्ये कोविड संकट वाढत असल्याने राज्य सरकार याबाबत फारसं अनुकूल दिसत नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान, उद्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सकाळी बैठक होईल आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत नवीन नियमावली जाहीर केली जाईल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावेळी अनलॉकच्या नियमांमध्येही काय शिथिलता देण्यात येणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER