
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी एका कार्यक्रमस्थळाहून घेतलेली एक्झिट सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे .वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेला शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित होते. सभा आटोपल्यानंतर पवार पत्रकारांशी संवाद साधतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पवारांनी यावर काहीच भाष्य केले नाही .
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेतील निर्णयासह राज्यातील विविध घडामोडींवर पवारांनी भाष्य करावे, अशी विनंती पत्रकारांनी पवारांना केली होती. त्यावर पवार यांनी दूर उभे असलेल्या अजित पवार यांच्याकडे हात दाखवत राज्य सरकार इथे आहे, तेच बोलतील, असे सांगितले.
तसेच यावेळी त्यांनी अजित पवारांकडे हाताचा इशारा दाखवायला ते विसरले नाही. यानंतर रोहित यांच्याबरोबर थोडा वेळ बातचीत करून ते नियोजित कामासाठी गाडीत बसून निघूनही गेले. आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा निरोप अजितदादांना दिला. त्यानंतर अजित पवार पत्रकारांना सामोरे आले. पण या प्रकारे अचानक कार्यक्रमस्थळाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी घेतलेल्या ‘एक्झिट’मुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत .
दरम्यान जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याशी त्यांची काही तरी चर्चा सुरू होती. त्यावेळी अजित पवार इमारतीच्या आवारात बरेच दूरवर उभे होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला