‘ठाकरे’ सरकारने पद्म पुरस्कारासाठी संजय राऊंतांच्या नावाची केली होती शिफारस

Sanjay Raut-Uddhav Thackeray

मुंबई : केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार ( Padma Award) जाहीर केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राज्य सरकारने शिफारस केलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. पण, त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले जाणार आहे.

ठाकरे सरकारने (Thackeray Govt) शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचंही नाव होतं. संजय राऊत यांनाही पद्म पुरस्कारने सन्मानित करण्यात यावे अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दर्शवली असून इतर 97 व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कार नाकारले आहे. संजय राऊत यांच्यासह विविध मान्यवरांचा या यादीत समावेश होता. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे नाव पद्मविभूषणसाठी पाठविले होते.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नावाची शिफारस ठाकरे सरकारने केली होती. राजकीय क्षेत्रातील केवळ 2 ते 3 जणांची नावे सरकारने सूचवली होती, त्यामध्ये विद्यमान खासदार असलेले एकमेव नेते संजय राऊत आहेत. त्यांसोबतच, कै. राजारामबापू पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, केंद्राने राजकीय नेत्यांपैकी एकाही व्यक्तीच्या नावाला संमती दिली नाही.

ही बातमी पण वाचा : ‘ती’ केस नसती तर बाळासाहेब १९९५ ला झाले असते मुख्यमंत्री?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER