शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार योजना; मंत्रिमंडळ बैठकीत घेणार निर्णय

Sharad Pawar-CM Thackeray

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सकार राज्यात ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावे असलेली ही योजना देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या योजनेशी जोडण्यात येणार आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

प्रस्तावित शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी रोजगार हमी विभाग हा नोडल विभाग असेल. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेवर पुढील तीन वर्षात १,००,००० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. राज्य सरकारने दावा केला आहे की, ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येतील. ग्रामीण भागातील लोक सशक्त बनतील. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करणे देखील आहे.

या योजनेंतर्गत १ लाख किमी रस्त्यांची निर्मिती केली जाईल. हे रस्ते शेतीपट्ट्यांना जोडले जातील. यामुळे शेतीपर्यंत जाणं सोयीचं होईल आणि रोजगारही उपलब्ध होईल. याशिवाय या योजनेंर्गत तलाव आणि तबेल्यांची निर्मिती करण्यात येईल. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेवर पुढील तीन वर्षात १,००,००० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे.

ही बातमी पण वाचा : आजोबांसाठी नातू मैदानात ! शरद पवारांच्या पत्रावरुन टीका करणाऱ्या विरोधकांवर रोहित पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER