राज्य सरकारला कायदे कळत नाहीत : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : केंद्राच्या कायद्याला विरोध करणारा कायदा केल्याशिवाय विरोध करणे म्हणजे केवळ दादागिरी सुरू आहे. राज्य सरकारला कायदे कळत नाहीत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या वक्तव्याचा भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खरपूस समाचार घेतला. केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेला कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर होते. यावेळी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते.

एखाद्या कायद्याला विरोध करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये त्या पद्धतीचा कायदा करून तो राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवण्यात येतो. मात्र, अशा पद्धतीचा कोणताच कायदा राज्य सरकारने केला नाही. त्यामुळे हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही, हे ते म्हणूच शकत नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER