
मुंबई :- राज्य सरकारने मोठा निर्णय घेत तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एम एम सूर्यवंशी, सहसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, यांची महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तर राहुल रेखावार यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण जीवननोत्ती अभियान, नवी मुंबई या रिक्त पदावर केली गेली आहे. आणि निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका, अकोला या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला