६ जून स्वराज्य दिन साजरा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Uday Samant

कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि कार्याची प्रेरणा आणि ऊर्जा युवापिढीला मिळावी या व्यापक उद्देशाने ६ जून शिव राज्याभिषेक दिन (Swarajya Day) हा राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात दरवर्षी स्वराज्य दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. या संदर्भात येत्या आठ दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या वतीने शासकीय आदेश जारी केला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

येथील सायबर कॉलेजमधील रूसा अंतर्गत डेटा सेंटर आणि सी. बी. एस. ई. राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सर्व जाती-धर्मातील मावळयांना बरोबर घेवून स्वराज्याच्या रक्षणासाठी लढा दिला. शेती, विविध व्यवसाय, व्यापार, उदीम, संरक्षण यासह राजकारण, समाजकारण, युद्धनीती आदी विविध क्षेत्रात त्यांनी केलेले नियोजन, व्यवस्थापन, घेतलेले निर्णय यांची माहिती आजच्या युवा पिढीला मिळावी, या व्यापक हेतूने स्वराज्य दिन महाविद्यालयात साजरा करण्यासंदर्भात विचार झाला. आता तो प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठ दिवसांत शासकीय आदेशही काढला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER