राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे मागितली ६ हजार कोटींची मदत

cm fadnavis-flood maharashtra

मुंबई : राज्यात आलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात महापूर आला आहे. पुरामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात अनेक लोकांची घरं पुरामुळे जमीनदोस्त झाले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ६ हजार कोटींचा निधी देण्याची मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा:- पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा – छगन भुजबळ

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ६ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी २ हजार ८८ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ ७५ कोटी, पडलेली घरे पूर्णपणे बांधून देणार आहोत, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटी रुपये देण्याचा निर्णय आहे.

तर तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी, जनावरांसाठी ३० कोटी, स्वच्छतेसाठी ७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.