राज्य शासन निष्क्रिय; एक दिवसीय लक्षणिक उपोषण करणार : समरजितसिंह घाटगे

Samarjeet Singh Ghatge

कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) खोटी आश्वासने देत, फक्त अध्यादेश काढत शेतकरी व नागरिकांची फसवणूक केली आहे. शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ फेब्रुवारीला दसरा चौकात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ कुटुंबासह एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे शाहू कारखान्याचे चेअरमन व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjeet Singh Ghatge) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

घाटगे म्हणाले, सरकार निष्क्रीय असल्यानेच जीआरला रद्दीची किंमत उरली नाही. लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीज बिलाचा प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रामाणिकपणाने कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अशा फक्त घोषणाच केल्या. शिवार संवाद यात्रा आणि माझ्यावर टीक करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळाली नाही. केवळ विरोधाला विरोध करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, हत्तीवरुन मिरवणूक काढू, असे जाहीर आवाहन घाटगे यांनी केले.

यावेळी माजी आमदार अमल महाडिक, जि.प. सदस्य अशोक माने, राजवर्धन निंबाळकर,अशोक चराटी, राहूल देसाई, बाबासाहेब पाटील, नाथाजी पाटील, अजिंक्य इंगवले, पृथ्वीराज यादव, भगवान काटे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER