राज्य नाट्य स्पर्धांना यंदा ब्रेक

Marathi Drama -Corona

कोल्हापूर : कोल्हापुरातील हौशी कलाकारांना (amateur artists) आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून राज्य नाट्य स्पर्धांना प्रारंभ झाला. कोल्हापुरात या स्पर्धेचे केंद्र सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न झाले. त्यातूनच 2000 मध्ये राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात उघडला. पण स्पर्धेसाठी नियुक्त परीक्षकांच्या गलथान कारभारामुळे अवघ्या चार वर्षांतच या स्पर्धा बंद पडल्या.

नव्याने कोल्हापूर केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याला यश मिळाले आणि 2011 साली पुन्हा कोल्हापूरचे नाव राज्य नाट्य स्पर्धेच्या यादीत आले. या नंतर दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धा होत होत्या. पण स्पर्धेच्या तालमींची तयारीही जून महिन्यापासूनच सुरु होत होती. नाटकाचा विषय,दिग्दर्शक, रंगमंच व्यवस्था, मेकअपमन, कलाकार, तालमीचे ठिकाण हे शोधण्यासाठी हौशी कलाकारांची लगबग सुरु असायची. पण यंदाही लगबग शांत आहे. कोरोनाचा फटका हा सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे हौशी कलाकार राज्य नाट्य स्पर्धा सुरु करण्याच्या होकार घंटेची प्रतिक्षा करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER