राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांच्या क्लीन चिटविरोधात माजी मंत्र्यांसह पाच जणांची याचिका

Ajit Pawar

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांना दिलासा मिळाला . मात्र आता पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . सहकारी बँक घोटाळ्यातील क्लोजर रिपोर्टच्या विरोधात माजी मंत्र्यांसह पाच जण प्रोटेस्ट याचिका दाखल करणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि 69 जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सेशन्स कोर्टात काही दिवसांपूर्वीच क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता.

मुंबईच्या सेशन्स कोर्टात आज प्रोटेस्ट याचिका दाखल केली जाणार आहे. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिकराव जाधव यांच्यासह आणखी दोघे जण ही प्रोटेस्ट याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार, हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER